Latest

मोठी बातमी ! मुंबईच्या धर्तीवर पुण्याच्या शेजारी उभं राहणार ‘नवं पुणे’ शहर !

कल्पना करा… पुण्याजवळ असं हायटेक शहर उभं राहणार, जिथे एकाच खांबावर रस्ता, उड्डाणपूल आणि मेट्रो धावणार आहे.
मंडळी, पुण्यावरील वाढता लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी पुरंदर तालुक्यात नवी मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक शहर उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात हे शहर विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. आधुनिक रस्ते, नियोजनबद्ध वसाहती, उद्योग, आयटी पार्क, रोजगाराच्या संधी आणि जागतिक दर्जाच्या सुविधा अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडवरील ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच भविष्यातील वाढ नियोजनबद्ध पद्धतीने होईल.

विमानतळामुळे या भागाला देश-विदेशाशी थेट जोडणी मिळेल, त्यामुळे गुंतवणूक आणि रोजगारालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. नक्कीच हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला, तर पुढील काही वर्षांत पुण्याच्या विकासाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलू शकतो आणि महाराष्ट्राला एक नवीन हायटेक शहर मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button