
तुम्ही आतापर्यंत अंबानींचे पेट्रोल, जिओ आणि स्वस्त शीतपेयांबद्दल ऐकलं असेल. पण आता अंबानींनी थेट दूध बाजारातच एन्ट्री केली आहे ! विशेष म्हणजे, या नव्या उत्पादनाची किंमत आहे फक्त २० रुपये ! नेमकं काय आहे नवीन उत्पादन ?
तर मंडळी, रिलायन्स इंडस्ट्रीजची एफएमसीजी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने ‘जॉयलँड’ या ब्रँडअंतर्गत फ्लेवर्ड मिल्क बाजारात आणलं आहे. सध्या हे उत्पादन तामिळनाडूमध्ये उपलब्ध करण्यात आलं आहे.
फ्लेवर्ड दुधाचे स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला असे दोन फ्लेवर्स सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे दूध थेट पिण्यासाठी तयार स्वरूपात मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना वेगळं काही तयार करण्याची गरज नाही.
आता कंपनी लवकरच हे उत्पादन देशातील इतर राज्यांमध्येही आणण्याच्या तयारीत आहे. भविष्यात आणखी फ्लेवर्स आणि दुग्धजन्य पेयांचे पर्यायही बाजारात येऊ शकतात.
याआधी रिलायन्सने १० रुपयांच्या कॅम्पा शीतपेयातून बाजारात स्पर्धा वाढवली होती. आता दूध बाजारातही मोठ्या कंपन्यांना आव्हान मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.





