Latest

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 4 हजार 500 चा भाव

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार आवारात शनिवारी कांद्याची मोठी आवक झाली. तब्बल ५२ हजार ८७३ गोण्यांची आवक नोंदवण्यात आली. लिलावात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मंडळी, कांद्याचे दर काही दिवसांपूर्वी ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र मागील आठ दिवसांपासून दर ४ हजार ५०० रुपयांच्या आसपास स्थिर असल्याचे चित्र आहे.

याच दिवशी नेप्ती बाजारात २९ हजार ८० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. दोन नंबरच्या कांद्याला २ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपये, तीन नंबरला १ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपये, तर चार नंबरच्या कांद्याला ७०० ते १ हजार ४०० रुपये भाव मिळाला.

विशेष म्हणजे उच्च प्रतीच्या कांद्याला आणखी चांगला भाव मिळाला. १२ गोण्यांच्या लॉटला ४ हजार ८०० रुपये, ५२ गोण्यांना ४ हजार ७०० रुपये आणि ४२ गोण्यांना ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांनी कांदा प्रतवारी करून आणावा आणि २४ तासांत हिशोबपट्टी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button