Latest

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर… पीककर्जात मोठी वाढ!

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. २०२६-२७ हंगामासाठी पीककर्जाच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार सोयाबीनसाठी सुमारे ५९ हजार रुपयांपर्यंत, तर उसासाठी तब्बल अडीच लाख रुपयांपर्यंत पीककर्ज मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

याशिवाय, सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांसाठीही कर्जमर्यादा वाढवण्यात आली आहे. हळदीसारख्या मसाला पिकासाठी तब्बल १ लाख ४८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फळबागांसाठीही १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ सुचविण्यात आली आहे.

अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यात सोयाबीन आणि उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या निर्णयाचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे पीककर्ज एक वर्षापर्यंत बिनव्याजी दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button