
अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील अशा शाळांनी आता विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये कपात करावी, असे स्पष्ट आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.
मंडळी, शासनाकडून वेतन अनुदान घेत असलेल्या अनेक शाळांबाबत पालकांकडून तक्रारी येत होत्या. सरकारकडून आर्थिक मदत मिळत असतानाही विद्यार्थ्यांकडून पूर्वीप्रमाणेच पूर्ण शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला जात होता. यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती.
अनुदान असल्याने या शाळांच्या खर्चाचा मोठा भाग शासन उचलत आहे. मात्र, शासनाकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीचा फायदा विद्यार्थी आणि पालकांना मिळत नसल्याचे समोर आले. शाळांना अनुदान वाढत असतानाही शुल्कात अपेक्षित कपात केली जात नसल्यामुळे शिक्षण संचालनालयाने याची गंभीर दखल घेतली.
त्यामुळे आता अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांनी विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये कपात करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो पालकांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळी हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा..





