
तुम्ही रोज रात्री हेल्दी समजून जे खात आहात, तेच तुमच्या पोटाच्या आणि झोपेच्या समस्येचं कारण असू शकतं !
मंडळी, रात्री काय खाता यापेक्षा ते योग्य वेळी आणि योग्य पदार्थ आहेत का, हे जास्त महत्त्वाचं आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते काही पौष्टिक पदार्थही रात्री टाळणं फायदेशीर ठरू शकतं. पालकातील फायबर आणि लोह पचायला वेळ लागतो, त्यामुळे पोट जड वाटू शकतं.
फळे आणि फळांचे रस रात्री घेतल्यास काही लोकांना पोट फुगणे आणि झोपेचा त्रास होऊ शकतो. कच्ची काकडी आणि बीट हे थंड गुणधर्माचे असल्याने काहींमध्ये पचन मंदावू शकते. मोड आलेली कडधान्ये फायबरयुक्त असल्यामुळे रात्री गॅस आणि अपचन वाढण्याची शक्यता असते.
तसेच दही रात्री खाल्ल्यास काही व्यक्तींना कफ, जडपणा किंवा पचनाचा त्रास जाणवू शकतो. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे सतत त्रास होत असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
योग्य वेळेवर आणि संतुलित आहार घेतल्यास पचनही चांगले राहते आणि झोपही शांत लागते.





