Latest

अहिल्यानगर शहरात घर घेण्याआधी ही बातमी पहाच ! एनए प्लॉटवरील बांधकामांना ब्रेक… कारण काय ?

अहिल्यानगरच्या नवनागापूर आणि वडगाव गुप्ता परिसरात विकासकामांना अचानक खीळ बसली आहे. यामागचं कारण आहे सीना नदीची पूरनियंत्रण रेषा! या एका नियमामुळे तब्बल ६२५ एकर जमिनीचा विकास रखडला असून, २७५ हून अधिक शेतकरी आणि खातेदार अडचणीत सापडले आहेत.

शहरालगत असलेल्या या जमिनींवर उद्योग, व्यवसाय आणि बांधकामाच्या दृष्टीने मोठ्या संधी आहेत. मात्र, ऑक्टोबरपासून नव्या बिगरशेती परवानग्या थांबल्या आहेत. एवढंच नाही, तर यापूर्वी एनए मंजुरी मिळालेल्या भूखंडांवरील बांधकामांनाही परवानग्या नाकारल्या जात असल्याचं समोर आलं आहे.

नवनागापूर एमआयडीसीत शासकीय भूखंड शिल्लक नसताना खासगी जमिनींवरही निर्बंध आल्याने नवीन उद्योगांच्या विस्ताराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुंतवणूक चाकण, रांजणगाव किंवा इतर औद्योगिक क्षेत्रांकडे वळण्याची शक्यता आहे.

आता शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पूररेषेचा नव्याने तांत्रिक अभ्यास करण्याची मागणी केली आहे. सीना नदीच्या प्रवाहाला धक्का न लावता पूररेषेचा फेरआढावा घेतला जाणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button