Latest

तुमच्या घराजवळ ‘ही’ 8 झाडे असतील तर सावध राहा ! पावसाळ्यात साप घरात आलाच म्हणून समजा

पावसाळा सुरू झालाय, आता साप दिसण्याच्या घटना वाढतील. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या अंगणातील काही झाडे आणि झुडपे सापांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरू शकतात ?

खरेतर, पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी साचल्यामुळे ते नवीन आणि कोरडी जागा शोधू लागतात. अशावेळी घराभोवतीची काही झाडे आणि झुडपे त्यांच्यासाठी लपण्याची उत्तम जागा बनतात.

सर्वात पहिले नाव येते बांबूच्या दाट झुडपांचे. बांबूच्या बुडाशी थंड आणि सुरक्षित जागा मिळत असल्याने साप येथे सहज लपतात. तसेच मेहंदी, मोरपंखी, ड्युरांटा आणि दाट कुंपणासारखी झुडपे यांच्याखालीही साप लपून बसू शकतात. केळीच्या झाडांभोवती कायम ओलावा असतो आणि सुकलेल्या पानांचे ढीग तयार होतात.

ही ठिकाणेही सापांना आकर्षित करतात. याशिवाय खजूर आणि पाम जातीच्या झाडांखाली पडलेल्या सुक्या पानांमध्येही साप लपण्याची शक्यता असते. मात्र यासाठी झाडे तोडण्याची गरज नाही.

नियमित गवत कापणे, झुडपांची छाटणी करणे, सुकलेली पाने हटवणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे हेच सर्वोत्तम उपाय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button