
अहिल्यानगरमध्ये एक नवीन आणि धोकादायक सायबर स्कॅम समोर आला आहे आणि या वेळी टार्गेट आहेत तरुण! मंडळी, ‘हाय प्रोफाइल महिलांसोबत वेळ घालवा आणि काही तासांत हजारो रुपये कमवा’ असे मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण या आमिषामागे लपलेला आहे मोठा फसवणुकीचा सापळा.
सायबर भामटे तरुणांना ‘कॉल बॉय’ बनवण्याचे आमिष दाखवतात. सुरुवातीला रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सच्या नावाखाली काही पैसे मागितले जातात. इतकंच नाही, तर आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि इतर वैयक्तिक माहितीही घेतली जाते.
एकदा ही माहिती त्यांच्या हातात गेली की, खरा खेळ सुरू होतो.. तरुणांना कोणतीही नोकरी मिळत नाही, उलट त्यांची आर्थिक फसवणूक होते. आणि काही प्रकरणांमध्ये ब्लॅकमेलिंगलाही सुरुवात होते. मंडळी, हा स्कॅम आधी मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता. प
ण आता तो ग्रामीण भागातही पोहोचला आहे आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण याचे मुख्य लक्ष्य बनत आहेत. म्हणूनच सावध राहा, लक्षात ठेवा, एक चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतो. ही माहिती प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा. व्हिडीओ शेअर करा, लाईक करा..





