Latest

बँक, झेडपी आणि मग ग्रामपंचायत…; अहिल्यानगरमध्ये निवडणुकांचा सीझन ! पुढील सहा महिने निवडणुकांचेच वातावरण?

अहिल्यानगरमध्ये आता राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. पुढील काही महिन्यांत एकामागोमाग एक महत्त्वाच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

मंडळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून प्रारूप मतदार यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये बँकेची निवडणूक होऊ शकते. याच पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सुमारे ८५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुका आणखी लांबवू नयेत, असे स्पष्ट संकेत दिल्याने अनेक इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहेत. तब्बल चार वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या निवडणुकांमुळे स्थानिक राजकारणात पुन्हा हालचाली वाढल्या आहेत.

आता राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येणारे काही महिने अहिल्यानगरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button