
तुम्ही अहिल्यानगर जिल्हा किंवा महाराष्ट्रात शिक्षक किंवा मुख्याध्यापक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता शाळांमध्ये जुन्या पद्धतीने हजेरी लावण्याचे दिवस संपले आहेत.
शिक्षण आयुक्तालयाच्या नवीन परिपत्रकानुसार, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी आता ‘स्विफ्ट चॅट’ (Swift Chat) ॲपवर ऑनलाईन हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे.
ही सर्व प्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून ‘स्मार्ट अटेंडन्स’ बोटद्वारे थेट सुरू होत आहे. हजेरी नोंदवण्याची मुख्य जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर असेल.
जर शाळा शालार्थ पोर्टलवर असेल, तर यू-डायस (U-DISE) कोड वापरून आणि नसल्यास यु-डायस प्लस पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे ही हजेरी भरावी लागेल. दोन सत्रांतील शाळांसाठी सकाळी ७ ते १२ आणि इतर शाळांसाठी सकाळी १० ते ५ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या अंतर्गत आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती थेट रिअल-टाइम ट्रॅक केली जाणार आहे.





