
दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीशिवाय होत नसेल, तर हा व्हिडीओ नक्की पहा ! खूप गरम पेय पिण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा एका मोठ्या अभ्यासातून समोर आला आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तब्बल ९.८ लाख लोकांचा सुमारे १४ वर्षे अभ्यास केला. यामध्ये अतिशय गरम पेय घेणाऱ्यांमध्ये अन्ननलिकेच्या स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचा धोका जवळपास तिप्पट आढळला.
तसेच दिवसातून सहा किंवा त्याहून अधिक गरम पेये घेणाऱ्यांमध्ये हा धोका ७१ टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले. यामागे गरम पेयामुळे अन्ननलिकेच्या आतील पेशींना वारंवार होणारी उष्णतेची इजा कारणीभूत ठरू शकते.
मात्र, अभ्यासात पेयाचे तापमान लोकांनी स्वतः सांगितले होते, त्यामुळे याचा अर्थ चहा-कॉफी पूर्णपणे बंद करावी असा नाही. तज्ज्ञांचा साधा सल्ला आहे—पेय तोंडाला किंवा घशाला जळजळ होणार नाही, इतके थंड झाल्यानंतरच प्या.





