
देशभरातील कोट्यवधी बँक खातेदारांसाठी मोठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असून भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. याचा परिणाम आता थेट ATM सेवांवर दिसू लागला आहे.
ATMमध्ये रोख रक्कम पोहोचवणाऱ्या कंपन्यांनी Indian Banks’ Association कडे शुल्कवाढीची मागणी केली आहे. इंधन महागाई, वाहन खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या वेतनामुळे कॅश लॉजिस्टिक कंपन्यांचा खर्च तब्बल 20% पर्यंत वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
जर बँकांनी ही मागणी मान्य केली तर ATMमधून मोफत व्यवहारांची मर्यादा कमी होऊ शकते. तसेच अतिरिक्त व्यवहारांसाठी जास्त शुल्क भरावे लागू शकते. म्हणजेच स्वतःचेच पैसे काढण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
तज्ज्ञांच्या मते मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिला तर वाहतूक, बँकिंग आणि दैनंदिन सेवांचे खर्च आणखी वाढू शकतात. तर मग मंडळी ATM शुल्क वाढल्यास सर्वसामान्यांवर किती परिणाम होईल ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





