Latest

पेट्रोलचा शॉर्टेज आणि किमतीने हैराण झालात ? मग ‘या’ Electric स्कुटर्स वापरा !

वाढत्या पेट्रोलच्या किंमती, पेट्रोलचा शॉर्टेज त्यामुळे कंटाळून तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेणार आहात का ? मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. मंडळी, भारतात काही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कुटर्स लाँच झाल्या आहेत, ज्या कमी खर्चात जास्त रेंज देतात.

यात सर्वात आधी येते Hero MotoCorp ची Vida इलेक्ट्रिक स्कुटर. या स्कुटरची सुरुवातीची किंमत फक्त 44 हजार रुपये असून ती जवळपास 110 किमी रेंज देते. टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि स्मार्ट फीचर्समुळे ती तरुणांची पसंती बनतेय.

यानंतर Bajaj Auto ची Bajaj Chetak EV. क्लासिक लूक आणि 123 किमी रेंजमुळे ही स्कुटर खूप चर्चेत आहे. या यादीत Ather Energy ची Ather Rizta सुद्धा आहे, जी की आरामदायी सीट, मोठं स्टोरेज आणि Google Maps नेव्हिगेशनसाठी ओळखली जाते.

तसेच Ola Electric ची Ola S1 X सुद्धा या यादीत आहे, ही स्कूटर कमी किमतीत दमदार फीचर्स देते. याशिवाय TVS Motor Company ची TVS iQube सुद्धा या यादीत आहे. स्मार्ट नेव्हिगेशन आणि चांगल्या रेंजसाठी ही गाडी लोकप्रिय बनलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button