Latest

महागाईचा आणखी एक दणका ! आता कपडे शिवून घेणंही होणार महाग…

मंडळी, पॅन्ट-शर्टच्या शिलाईसाठी आता ५० ते १०० रुपये जास्त मोजावे लागू शकतात. राज्यातील शिलाई व्यावसायिकांनी वाढत्या महागाईमुळे शिलाई दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन, वीज, दुकानांचे भाडे, कामगारांचे वेतन तसेच धागे, झिप, बटणे आणि इतर साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे टेलर्सवर आर्थिक ताण वाढला आहे.

रेडिमेड कपडे आणि ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला असला तरी फिटिंगचे कपडे पसंत करणाऱ्या ग्राहकांमुळे टेलरिंग व्यवसाय अजूनही टिकून आहे. अनेक टेलर्स ग्राहक टिकवण्यासाठी कमी नफ्यात काम करत होते. मात्र वाढत्या खर्चामुळे दरवाढ अपरिहार्य ठरली आहे.

सध्या पॅन्ट-शर्ट, सफारी, सूट, शेरवानी, जॅकेट आणि कुर्ता-पायजमा अशा विविध कपड्यांच्या शिलाईचे दर वाढले आहेत. त्यामुळे लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा खास प्रसंगासाठी कपडे शिवून घेण्याचा विचार करत असाल, तर आता आधीपेक्षा अधिक खर्चाची तयारी ठेवावी लागेल.

तुम्ही रेडिमेड कपड्यांना पसंती देता की शिवून घेतलेले फिटिंग कपडे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button