
मंदिरात गेल्यानंतर एखाद्याला आपलं घर गाठल्यासारखं वाटत ? अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत असंच काहीतरी घडलंय. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना आलेला अनुभव ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. नेमकं काय घडलंय ते सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, निवेदिता सराफ यांना स्वामी समर्थांची भक्ती करण्याची प्रेरणा पती अशोक सराफ यांच्याकडून मिळाली. अशोक सराफ तब्बल सहा वर्षे स्वामींचं व्रत करत होते. त्यानंतर निवेदिता यांनीही स्वामींचं चरित्र वाचायला सुरुवात केली. पुढे त्या अक्कलकोटला दर्शनासाठी गेल्या.
तिथल्या समाधी मठात चांदीच्या कमानीसमोर डोकं टेकवलं आणि त्यांना आपण आपल्या घरी परतल्यासारखं वाटलं. स्वामींच्या पादुका आणि त्यांच्या वस्तूंना स्पर्श करताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. विशेष म्हणजे, हे अश्रू दुःखाचे किंवा आनंदाचे नव्हते, तर श्रद्धेचे होते.
स्वामींच्या रूपाने मला माझी आई भेटली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर मग मंडळी, तुम्हालाही स्वामी समर्थांच्या दर्शनाचा असा काही अनुभव आला आहे का? कमेंट करून नक्की सांगा!





