Latest

कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप अन् अचानक मृत्यू…..सह्याद्री मल्टिस्टेटचे संस्थापक संदीप थोरात यांच्या निधनाने खळबळ !

सह्याद्री मल्टिस्टेटचे संस्थापक संदीप थोरात यांचे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली असून, या घटनेमुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळालं आहे.

संदीप थोरात यांच्यावर सह्याद्री मल्टिस्टेट आणि ‘क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप होते. अनेक ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.

अटकेनंतर त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली होती. यादरम्यान त्यांना फुफ्फुसांचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, त्यांच्या निधनामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार, आर्थिक व्यवहारांचा तपास कसा पुढे जाणार आणि या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button