Latest

‘इंडिया हेल्थ कोशंट’चा चिंताजनक अहवाल ! शहरात राहणारे 82% भारतीय तणावाखाली, कारण ऐकून धक्काचं बसेल

मोठ्या शहरात राहणं म्हणजे चांगली नोकरी, आधुनिक जीवनशैली आणि सुविधा… पण याच शहरी जीवनामुळे मानसिक तणाव झपाट्याने वाढत असल्याचे एका धक्कादायक सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘इंडिया हेल्थ कोशंट’च्या अहवालानुसार, तब्बल 82 टक्के शहरी भारतीय मानसिक तणावाखाली जगत आहेत.

विशेष म्हणजे, या तणावामागे आजार किंवा आरोग्य समस्या नसून आर्थिक चिंता हे मुख्य कारण आहे. महागाई, वाढते घरभाडे, कर्जाचे हप्ते, बचतीची चिंता आणि भविष्याची आर्थिक असुरक्षितता यामुळे तरुणांपासून नोकरदारांपर्यंत अनेकजण मानसिक दबावाखाली आहेत.

25 ते 34 वयोगटातील तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अनेकांनी तणावाचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावरही होत असल्याचे सांगितले.

झोप न लागणे, थकवा, चिंता आणि अस्वस्थता यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य शहरांपेक्षा चांगले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पैसा आणि आधुनिक जीवनशैली म्हणजेच आनंद असे समीकरण आता बदलताना दिसत आहे. पण, मंडळी तुम्हाला या अहवालाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button