Latest

भारतासाठी धोक्याची घंटा……; एल-निनोचा परिणाम आणखी ‘इतके’ महिने राहणार, पुढल्या वर्षी पण दुष्काळ पडणार ? कोलंबिया विद्यापीठाच्या रिसर्चने खळबळ

हवामान क्षेत्रातून भारतासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. २०२६ च्या अखेरीस आणि २०२७च्या सुरुवातीला एल-निनोची स्थिती अत्यंत तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोलंबिया विद्यापीठाच्या इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट अँड सोसायटी अर्थात IRI ने २१ सप्टेंबरला हा अंदाज प्रसिद्ध केला. संस्थेने अभ्यासलेल्या २२ मॉडेल्समध्ये २०२६-२७ च्या हिवाळ्यात तीव्र एल-निनोचे संकेत मिळाले आहेत.

फेब्रुवारी २०२७ पर्यंत एल-निनोची शक्यता १०० टक्के असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर २०२७च्या मध्यापर्यंत ही शक्यता ६१ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. एल-निनोचा परिणाम भारतातील पावसावर आणि त्यामुळे शेती उत्पादनावर होण्याची शक्यता असते.

मात्र, केवळ एल-निनोच्या आधारावर भारतातील पर्जन्यमान किंवा कृषी उत्पादनाचा अचूक अंदाज लावता येत नाही. त्यामुळे आगामी काळात पाऊस, शेती आणि हवामानातील बदलांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button