Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग : धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आजपासून बेमुदत बंदची घोषणा

अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर वातावरण तापलं आहे. त्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आणि हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने शहरासह उपनगर आणि परिसरात बेमुदत बंदची हाक दिली आहे.

९ ऑगस्टपासून हा बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

तसेच अहिल्यानगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन न्यायाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.दरम्यान, आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मात्र, हा लढा शांततेच्या मार्गाने आणि कायदेशीर पद्धतीने सुरू ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीने आता अहिल्यानगरमध्ये जोर धरला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांसमोर परिस्थिती शांत ठेवण्याचं मोठं आव्हान राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button