Latest

१५ व्या वर्षी क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता वैभव सूर्यवंशी बॉलिवूडमध्ये झळकणार ? प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली पोस्ट

मंडळी, १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL गाजवल्यानंतर आता चित्रपटात झळकणार का ? याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. आयपीएल 2026 मध्ये शानदार फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या वैभवला आता थेट प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपटासाठी पसंती दाखवली आहे.

शेखर कपूर यांनी त्यांच्या X अकाऊंटवर वैभवचा फोटो शेअर करत त्याच्या खेळीचे भरभरून कौतुक केले. त्यांनी लिहिले की, “जर वैभव इतका मोठा क्रिकेट स्टार नसता, तर मी त्याला ‘मासूम: द न्यू जनरेशन’मध्ये कास्ट केले असते.

” आता या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट 1983 च्या गाजलेल्या ‘मासूम’ चित्रपटाचा सीक्वल असणार आहे. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, मनोज बाजपेयी आणि नित्या मेनन यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार असल्याची चर्चा आहे.

मात्र, वैभव सूर्यवंशी खरोखर चित्रपटात दिसणार का? याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण क्रिकेटमधील हा युवा स्टार आता बॉलिवूडच्याही रडारवर आला आहे, हे नक्की ! पण मंडळी तुम्हाला काय वाटतं वैभव बॉलिवूडमध्ये येऊ शकतो का? कमेंट नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button