
“शेतीत काहीच भविष्य नाही, शेतीतुन फक्त पोट भरत…” असं म्हणणाऱ्यांनी ही गोष्ट नक्की ऐका !
पाथर्डी तालुक्यातील खांडगावचा प्रज्वल जगदाळे हा पोस्ट ग्रॅज्युएट आणि संगीत विशारद तरुण आज शेवग्याच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत चर्चेत आला आहे.
प्रज्वलने फक्त ३ एकरात शेवग्याची लागवड केली. ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि तंत्रशुद्ध नियोजन यामुळे अवघ्या सहा महिन्यांत त्याला जवळपास ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे शेवग्याचे पीक वर्षातून दोनदा येते, त्यामुळे नियमित कमाईची मोठी संधी तयार झाली आहे.
या यशामागे त्याच्या कुटुंबाचे मार्गदर्शन आणि आधुनिक शेतीची योग्य माहिती महत्त्वाची ठरली. प्रज्वल सांगतो, “शेती कष्टाची आहे, पण योग्य नियोजन आणि नवीन तंत्रज्ञान वापरलं तर शेतीतही मोठं यश मिळू शकतं.” आज अनेक तरुण नोकरीच्या मागे धावत आहेत, पण प्रज्वलसारखे युवक शेतीला आधुनिक व्यवसाय बनवत आहेत.





