Latest

हवामानात अचानक मोठा बदल…; अहिल्यानगर, पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस ! दिवाळीतही पावसाची हजेरी

अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील वातावरण बदललं असून, पुढील काही दिवस राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. नेमका कुठे पाऊस पडणार ? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, हवामानाच्या अंदाजानुसार, आज ३० आणि उद्या ३१ ऑक्टोबरला कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

तिकडे विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्येही पावसाचा अंदाज आहे. एवढंच नाही, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचं सावट कायम राहू शकतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, काढणी केलेली पिकं सुरक्षित ठेवा आणि हवामानाच्या सूचनांकडे लक्ष द्या ! तर मग मंडळी, तुमच्याकडे हवामानात बदल झालाय का ? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button