
महाराष्ट्रातील भूमिहीन कुटुंबांसाठी सरकारने एक योजना जाहीर केली आहे. या योजनेतून पात्र नागरिकांना शंभर टक्के अनुदानावर जमीन मिळणार आहे. नेमकी कशी आहे योजना ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन मिळू शकते.
मात्र, यासाठी काही अटी आहेत. अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील, भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील किंवा अंत्योदय कार्डधारक असावा. वय १८ ते ६० वर्षे असणे आवश्यक आहे.
विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांना प्राधान्य दिले जाते. पात्र तृतीयपंथीय व्यक्तींनाही अर्ज करता येतो. अर्जासाठी जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. तर मग मंडळी तुम्हाला सरकारची ही योजना आधीपासूनचं माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.





