Latest

ट्रॅक्टर, बुलेट, चांदीची गदा पटकावणाऱ्या ‘चित्रा’चा नवा रेकॉर्ड…..; हिंदकेसरी ‘चित्रा’ची तब्बल ४१ लाख ६१ हजारांना विक्री !

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात तब्बल पाचवेळा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावणारा उंबरेच्या मातीचा ‘चित्रा’ आता उरुळी कांचनच्या मैदानात धावणार आहे !

संभा आणि साईनाथ रघुनाथ भवार यांच्या मालकीच्या चित्राने अवघ्या अडीच-तीन वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मैदानं गाजवली. आपल्या वेगाच्या जोरावर त्याने ट्रॅक्टर, बुलेट, स्प्लेंडर, अॅक्टिव्हा, चांदीची गदा, पदकं आणि रोख बक्षिसं मालकाला मिळवून दिली.

या कामगिरीमुळे उंबरे गावासह भवार कुटुंबाची ओळख बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात राज्यभर पोहोचली. मात्र वैयक्तिक कारणांमुळे चित्राची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. उरुळी कांचन येथील जीवन कोळेकर यांनी तब्बल ४१ लाख ६१ हजार रुपये मोजून चित्राची खरेदी केली.

ज्याला कुटुंबाने जीवापाड जपलं, त्या चित्राला निरोप देताना भवार कुटुंब आणि उंबरेकर भावूक झाले. आता उंबरेचा हा ‘हिंदकेसरी’ उरुळी कांचनच्या मैदानात पुन्हा आपल्या वेगाची झलक दाखवणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button