Latest

अहिल्यानगरकरांसाठी सोलरची मोठी संधी ! 78 हजार अनुदान आणि कर्जाचा लाभ; अर्जापासून कर्जापर्यंत सर्व एकाच ठिकाणी ! शेवटची तारीख कोणती ?

वीज बिलाचा वाढता भार कमी करायचा आहे? मग अहिल्यानगरकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे! घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज बिलातून दिलासा मिळवण्याची संधी आता अधिक सोपी झाली आहे.

महावितरण आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष ‘सेवा सेतू कॅम्प’ आयोजित केले जाणार आहेत.

या कॅम्पमध्ये पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसह राज्याच्या स्मार्ट सोलर योजनेची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कशी अपलोड करायची आणि योग्य वेंडर कसा निवडायचा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखवले जाणार आहे.

एवढंच नाही, तर सोलर प्रकल्पासाठी कमी व्याजदरात बँक कर्ज मिळवण्याबाबतही मार्गदर्शन केलं जाणार आहे.
पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत १ ते ३ किलोवॅट प्रकल्पासाठी ३० हजार ते ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button