Latest

सराफा बाजारात मोठा उलटफेर ! ‘या’ ४ कारणांमुळे सोनं स्वस्त होतंय… पण सोनं खरंच १ लाख रुपये तोळा होणार का ?

सोन्याच्या दरात मोठी घसरण सुरू असून ग्राहकांच्या नजरा आता सोन्याच्या भावाकडे लागल्या आहेत. सोनं स्वस्त होण्यामागची ४ महत्त्वाची कारणं ! पहिलं कारण म्हणजे, विक्रमी दरानंतर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात नफावसुली केली जात आहे.

दुसरं कारण, अमेरिकेतील महागाई आणि व्याजदरांबाबत वाढलेली चिंता. यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. तिसरं कारण, अमेरिकेच्या बाँडवरील उत्पन्नात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोन्याचं आकर्षण कमी होत आहे.

चौथं कारण म्हणजे, डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, नजीकच्या काळात सोन्याचे दर आणखी घसरू शकतात. मात्र, १० ग्रॅम सोनं थेट १ लाख रुपयांवर येण्याची शक्यता सध्या अत्यंत कमी मानली जात आहे.

रुपयाचं मूल्य, सणासुदीतील मागणी आणि जागतिक परिस्थितीही सोन्याचे दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तुम्ही सोनं खरेदी करणार की दर आणखी घसरण्याची वाट पाहणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button