
नगर ते परळीचा रेल्वे प्रवास आता आणखी जवळ येणार आहे ! अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
तब्बल २६१.२५ किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग नगर आणि मराठवाड्याच्या दळणवळणाला नवी दिशा देणार आहे. प्रकल्पाचा सुधारित अंदाजित खर्च ४ हजार ८०५.१७ कोटी रुपये असून, त्यातील निम्मा म्हणजे २ हजार ४०२.५९ कोटी रुपयांचा वाटा राज्य शासन उचलत आहे.
यापूर्वीही राज्य सरकारने मोठा निधी दिला असून, आतापर्यंत २ हजार ३४१.२३ कोटी रुपये वितरित झाले आहेत. आता उर्वरित कामांना वेग देण्यासाठी नव्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
ही रेल्वे केवळ रुळांवर धावणारी गाडी नसेल, तर नगर आणि मराठवाड्याच्या विकासाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे!





