Latest

दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय… ‘या’ शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार २० हजार रुपयांचे चारा बियाणे !

राज्यात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून, २०२६-२७ या वर्षासाठी विशेष सवलत लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर ४ हजार रुपयांचे चारा बियाणे मिळणार आहे. तर शेतकरी गटांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत २० हजार रुपयांपर्यंतचे चारा बियाणे दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे, वैयक्तिक लाभार्थ्यांकडे किमान तीन ते चार पशुधन असण्याची अट यंदासाठी शिथिल करण्यात आली आहे. मात्र, अतिरिक्त लाभासाठी चारा उत्पादनाकरिता पुरेसा पाणीसाठा असणे आणि नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसणे आवश्यक आहे.

या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button