
तुम्ही आजारपणात जे औषध घेता, ते सुरक्षित आहे ना? हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, औषधांच्या उत्पादन आणि विक्रीतील नियमभंग रोखण्यासाठी महाराष्ट्रात मोठी मोहीम राबवण्यात आली असून या कारवाईत तब्बल १९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे !
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांत तब्बल ४ हजार २५६ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये औषध उत्पादन करणाऱ्या ९६५ आणि विक्री करणाऱ्या ३ हजार २९१ आस्थापनांची तपासणी झाली.
या मोहिमेत १९ कोटी ११ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. नियमभंगाच्या प्रकरणांत ३३ गुन्हे दाखल झाले, तर १४ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय २८८ परवाने रद्द आणि ८५६ परवाने निलंबित करण्यात आले.
नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे मिळावीत, यासाठी तपासणी मोहीम अधिक व्यापक केली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.





