Latest

फॉर्च्युनर, बनावट नोटा अन् पैशांचा पाऊस…अहिल्यानगरमध्ये पैशांच्या पावसामागचं भलतंच रॅकेट उघड… समोर आलं धक्कादायक पुणे कनेक्शन

अंधश्रद्धेचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलीय. धक्कादायक म्हणजे, या आरोपींकडून तब्बल ९२ लाख ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत पोलिसांनी गणेश शेवाळे, सुमित चंदनशिवे आणि सुरज कांबळे या बारामतीतील तिघांना ताब्यात घेतलं.

त्यांच्या घरातून ५०० रुपयांच्या तब्बल १८ हजार ४१९ बनावट नोटा, नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोरे कागद, पाच मोबाईल आणि फॉर्च्युनर नव्हे तर फोक्सवॅगन कार जप्त करण्यात आली.

पोलिसांच्या तपासात या नोटा अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील साथीदारांकडून २५ हजार रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर आलीय. पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून नागरिकांना बनावट नोटांच्या माध्यमातून फसवलं जात असल्याचाही संशय आहे.

या प्रकरणात दोघे अहिल्यानगरमधील आणि एक नाशिकमधील आरोपी फरार आहेत. आता या टोळीचे आणखी किती धागेदोरे उघड होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button