
“ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्रांचा मारा आणि मृत्यू समोर दिसत असताना… राहुरीची एक तरुणी तब्बल तीन महिने समुद्रात अडकून होती!”
मंडळी, अमेरिका-इस्राईल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेतील होर्मुझ समुद्रधुनी रणांगण बनली. अशा भीषण परिस्थितीत राहुरीतील तेजस्विनी अक्षय खैरे या मालवाहू कंटेनर जहाजावर बोट इंजिनियर म्हणून कार्यरत होत्या.
त्यांचे ‘सीएमए सीजीएम मॅनअस’ हे जहाज संयुक्त अरब अमिरातीतील खलिफा बंदरातून अमेरिकेकडे निघाले होते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे जहाज तब्बल तीन महिने समुद्रात अडकून पडले. या काळात जहाजावरील दिवे बंद ठेवले जात होते.
बाहेर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू होते. अनेक जहाजांवर स्फोट झाले, काही खलाशी मृत्युमुखी पडले. अन्नपुरवठाही खंडित होत होता.
इतकेच नाही तर इराणी लष्कराने त्यांच्या जहाजावर सुमारे 20 मिनिटे गोळीबारही केला. सुदैवाने जीवितहानी टळली. अखेर करार संपल्यानंतर तेजस्विनी सुखरूप घरी परतल्या. मृत्यूच्या सावटातून परतलेल्या मुलीला पाहून कुटुंबाने सुद्धा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.





