Latest

कोपरगावातील ‘या’ सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांचा दुहेरी धक्का… सरपंचपद तर गेलंच, आता ग्रामपंचायतीतही राहता येणार नाही ! कारण….

अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच भारत चौधरी यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदावर २०२३ मध्ये त्यांची निवड झाली होती. मात्र, निवडीनंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या प्रकरणी पंकज अशोक गायकवाड यांनी २०२३ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. चौकशीनंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी २०२५ मध्ये भारत चौधरी यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला.

मात्र, निर्णयानंतरही त्यांनी तातडीने पदाचा कार्यभार सोडला नसल्याचे समोर आले. जवळपास वर्षभर सरपंचपदाचा कार्यभार सुरू राहिल्यानंतर अखेर त्यांचे सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्यत्व दोन्ही रद्द करण्यात आले. या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने ॲड. गोरख पालवे आणि ॲड. गणेश मोकळ यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button