Latest

शेतात आई-वडिलांना मदत करणारी लेक आता होणार अधिकारी ! वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी कोपरगावच्या अपेक्षा गव्हाणे यांनी मिळवलं MPSC मध्ये यश!

अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावच्या अपेक्षा अण्णासाहेब गव्हाणे यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलंय. त्यांची महसूल सहायक अधिकारीपदी निवड झाली आहे.

अपेक्षा यांचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती हलाखीची, आई-वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे. मात्र, मुलीने मोठं अधिकारी व्हावं, हे स्वप्न त्यांनी कधीच सोडलं नाही.

विशेष म्हणजे, अपेक्षा घरी असताना अभ्यासासोबतच शेतात आई-वडिलांना मदत करायच्या. शेतीची कामं, घरची जबाबदारी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, असा तिहेरी संघर्ष करत त्यांनी आपलं ध्येय गाठलं.

या यशाचं श्रेय अपेक्षा यांनी आई-वडिलांच्या कष्टांना, त्यागाला आणि आशीर्वादांना दिलंय. अवघ्या २३ व्या वर्षी मिळवलेलं हे यश केवळ एका कुटुंबाचा आनंद नाही, तर संपूर्ण अंजनापूर गावासाठी अभिमानाचा क्षण ठरलाय. शेतात राबणाऱ्या आई-वडिलांच्या घामाचं चीज करणाऱ्या अपेक्षा गव्हाणे यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button