Latest

भारतावर १० हजार किलोमीटर लांबीचा ढगांचा पट्टा ! मान्सून आणखी जोर धरणार ?

भारतापासून थेट दक्षिण कोरियापर्यंत तब्बल १० हजार किलोमीटर लांबीचा ढगांचा विशाल पट्टा उपग्रहात दिसून आला आहे. मंडळी, आकाशात असा नजारा क्वचितच पाहायला मिळतो. यामुळे ‘इन्सॅट-३डीआर’ उपग्रहाने टिपलेल्या या दृश्यामुळे हवामान तज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा ढगांचा पट्टा मोठ्या वातावरणीय प्रणालीचा भाग असून, त्यामुळे येत्या काही दिवसांत देशभर मान्सून अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पाऊस, तर डोंगराळ प्रदेशात पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.

गेल्या दोन दिवसांत देशात सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. या पावसामुळे जलाशयांतील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल आणि खरीप हंगामातील पिकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो.

मात्र नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि अतिवृष्टीचा इशारा असलेल्या भागात आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button