Latest

सोने चांदी रेकॉर्डब्रेक घसरले ! किमतीही कमी होण्याची काय आहेत कारणे? पहा..

सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, गेल्या काही महिन्यांतील नीचांकी पातळीवर भाव पोहोचले आहेत.

मंडळी, मजबूत होत असलेल्या अमेरिकन डॉलरचा आणि जागतिक बाजारातील कमी झालेल्या मागणीचा थेट परिणाम आता सोन्या-चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ८०० रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी तब्बल ५ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सध्या ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४५ हजार ३०० रुपयांवर आला आहे. मागील सत्रात हा दर १ लाख ४८ हजार १०० रुपये होता. तर चांदीचा दर प्रतिकिलो २ लाख २६ हजार रुपयांवर आला असून, यापूर्वी तो २ लाख ३९ हजार रुपये होता.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्या-चांदीऐवजी डॉलरकडे वाढत आहे. त्याचबरोबर अमेरिकेत व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता असल्याने मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक कमी होत आहे. याच कारणामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

तज्ज्ञांचे असेही मत आहे की, पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहू शकतात. त्यामुळे खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button