
अहिल्यानगरसह राज्यभरात खवा आणि पनीरच्या दरांनी अचानक उसळी घेतली आहे..आणि यामागे एक नाव चर्चेत आहे.. तुकाराम मुंढे! मंडळी, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली. या कारवायांचा परिणाम आता थेट बाजारावर दिसू लागला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागांत दुधाचे संकलन कमी झालेय. त्यामुळे खवा आणि पनीरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून दरात मोठी वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी २८० ते ३०० रुपये किलो असलेला खवा आता ३८० रुपये किलोपर्यंत तर पनीर पूर्वी ३७० ते ३८० रुपये किलो दराने मिळणारे पनीर आता ४०० ते ४४० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे.
अनेक हॉटेल व्यावसायिकांना सध्या पनीरची कमतरता जाणवत असून आगाऊ ऑर्डर द्यावी लागत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, भेसळयुक्त दूध आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई सुरू होताच अनेक खासगी उत्पादकांनी उत्पादन कमी केले किंवा बंद केले आहे.
त्यामुळे बाजारात डुप्लिकेट माल कमी झाला, पण त्याचवेळी ओरिजनल खवा आणि पनीरचे दर वाढले आहेत. मंडळी मुंढेंच्या कारवाईने आपण समाधानी आहेत का? कमेंट करा..





