
तुमच्या किचनमधील गॅस पाइपचा रंग केशरी का असतो, याचा कधी विचार केला आहे का? अनेकांना वाटतं हा फक्त डिझाइनचा भाग आहे, पण त्यामागे सुरक्षा आणि ओळख यांचं महत्त्वाचं कारण दडलं आहे. एलपीजी गॅस पाइप हा मजबूत रबर आणि विशेष सुरक्षा थरांपासून तयार केला जातो. त्याचे काम सिलिंडरमधून गॅस सुरक्षितपणे शेगडीपर्यंत पोहोचवणे हे असते.
केशरी रंगाचा पाइप सहज ओळखता यावा आणि एलपीजी वापरासाठी वेगळा दिसावा म्हणून अनेक कंपन्या हा रंग वापरतात. मात्र, केवळ रंग पाहून पाइप सुरक्षित आहे असे समजू नका. बाजारात हिरवे आणि पारदर्शक पाइपही उपलब्ध असतात.
काही हिरवे पाइप एलपीजीसाठी असतात, तर काही इतर वापरासाठी. पारदर्शक पाइप बहुतेक वेळा पाण्यासाठी किंवा कमी दाबाच्या कामांसाठी वापरले जातात. गॅस पाइप खरेदी करताना नेहमी ISI मार्क, LPG Approval आणि उत्पादनाची माहिती तपासा.
फाटलेला किंवा जुना पाइप वापरणे टाळा. लक्षात ठेवा, गॅस पाइपची सुरक्षा रंगावर नाही तर त्याच्या दर्जा आणि प्रमाणपत्रांवर अवलंबून असते.





