
अहिल्येच्या नगरीत नेमकं चाललंय तरी काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आलीये. एका तालुक्यात तब्बल ५५ अल्पवयीन मुली गरोदर असल्याची नोंद झालीये. मंडळी, महिला आणि बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणाची दखल आता थेट महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अकोले तालुक्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, बालविवाह आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे हा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अकोले तालुक्यात बालविवाह रोखण्यासाठी लवकरच कडक नियमावली लागू केली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ग्रामपातळीवरील बाल संरक्षण समित्या सक्रिय करण्याबरोबरच त्यांना विशेष निधी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मात्र, एका तालुक्यात ५५ अल्पवयीन मुली गरोदर असल्याची बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. हा फक्त आकड्यांचा विषय नाही तर समाज, प्रशासन आणि कुटुंब व्यवस्थेसमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. काय वाटत तुम्हाला ? कमेंट करा..





