Latest

शिर्डीत पहिल्यांदाच २ दिवसांचा भव्य डिफेन्स एक्स्पो ! नगरकरांना रॉकेट, मिसाईल, ड्रोन आणि क्षेपणास्त्र जवळून पाहता येणार

मंडळी लाइव्ह रॉकेट आणि मिसाईल जवळून पाहायचंय? तर २३ आणि २४ मे रोजी शिर्डीत होणारे भव्य संरक्षण प्रदर्शन चुकवू नका ! शिर्डीच्या सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी, विज्ञानप्रेमी आणि नागरिकांना येथे अत्याधुनिक संरक्षण साहित्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनात रॉकेट, क्षेपणास्त्र, ड्रोन, रॉकेट लाँचर आणि विविध इलेक्ट्रॉनिक संरक्षण यंत्रणा हे मुख्य आकर्षण असणार आहेत.

देशातील मोठ्या संरक्षण कंपन्यांसह १०० हून अधिक MSME उद्योग सहभागी होणार आहेत. या प्रकल्पात १५५ मिमी क्षमतेचे तोफगोळे तयार केले जाणार असून दरवर्षी तब्बल ५ लाख तोफगोळे उत्पादनाची क्षमता असणार आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण तंत्रज्ञान आणि कच्चा माल स्वदेशी आहे. तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन मोठी संधी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button