
मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे….; मेलोडी खाओ, खुद जान जाओ ? ही टॅगलाईन असणारी प्रसिद्ध टॉफी आता थेट शेअर बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे. मंडळी, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला.
त्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांना प्रसिद्ध Melody टॉफी गिफ्ट दिल्याचं दिसलं. व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. Parle Industries च्या शेअर्समध्ये वाढ झाली.
लोकांना वाटलं की Parle Industries Melody बनवणारी कंपनी आहे. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. खरेतर Melody तयार करणारी कंपनी शेअर बाजारात सूचीबद्धचं नाही. म्हणजे नाव साधर्म्यामुळे वेगळ्याच कंपनीच्या शेअरमध्ये अचानक खरेदी वाढली.
हा शेअर 5 टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किटला पोहोचला. Parle Industries चा बिस्किटं किंवा Melody टॉफीशी काहीही संबंध नाही.
कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि पेपर व्यवसायात काम करते. पण सोशल मीडिया आणि नावाच्या गोंधळामुळे गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली आणि शेअर झपाट्याने वाढला.





