Latest

महिलांसाठी महत्वाची बातमी ! PCOS नाही, आता PMOS ; पण, तज्ज्ञांनी अचानक नाव का बदललं ? जाणून घ्या कारण !

आज अनेक महिलांमध्ये हार्मोनल समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. दरम्यान आता PCOS हा आजार अधिकृतपणे PMOS — Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome या नव्या नावाने ओळखला जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, “PCOS” हे जुने नाव फक्त अंडाशयातील गाठींवर लक्ष केंद्रीत करत होते. पण प्रत्यक्षात हा आजार संपूर्ण शरीराच्या हार्मोनल आणि मेटाबॉलिक सिस्टीमवर परिणाम करतो. त्यामुळे नवीन नाव अधिक अचूक मानलं जात आहे.

PMOS मुळे वजन वाढणे, अनियमित पाळी, चेहऱ्यावर केस येणे, मुरूम, केस गळणे, इन्सुलिन रेझिस्टन्स, टाइप-2 डायबिटीज, तणाव आणि नैराश्याचा धोका वाढू शकतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे खराब लाइफस्टाइल जसे की, जंक फूड, झोपेची कमतरता आणि ताणतणाव.

तज्ज्ञ सांगतात, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि वेळेवर उपचार हेच नियंत्रणाचे महत्त्वाचे मार्ग आहेत. म्हणून कोणतही लक्षणं दिसल्यास स्वतः उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button