Latest

संगमनेर भोंदू बाबा प्रकरणात मोठा ट्विस्ट ! मास्टरमाइंड निघाला डॉक्टर…

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू गडगे महाराज प्रकरणात आता आणखी धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. ‘दत्तधाम’ आश्रम सील केल्यानंतर तपासाची दिशा बदलली असून, फरार डॉ. मोहन गिरी हाच या संपूर्ण रॅकेटचा खरा सूत्रधार असल्याचा संशय बळावत आहे.

गडगेला औषधांचा पुरवठा करणारा आणि त्याला सल्ला देणारा मुख्य व्यक्ती म्हणून गिरीचे नाव पुढे येत आहे.प्राथमिक माहितीनुसार, सिन्नर येथील रहिवासी असलेला गिरी हा स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत होता. मात्र त्याची वैद्यकीय पदवीच बनावट असल्याचे संकेत मिळत आहेत.

आश्रमात त्याचे सर्टिफिकेट लावून गडगे भक्तांना औषधे देत होता, त्यामुळे अनेक जणांची दिशाभूल झाल्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, गिरी सिन्नर येथेच औषधे तयार करून राज्यातील इतर भोंदूंनाही पुरवत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणात मोहन गिरीसह ज्ञानेश्वरी गडगे आणि इतर संशयित फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तपास अधिक खोलात जात असताना आणखी मोठे जाळे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वांचे लक्ष आता फरार मोहन गिरीच्या अटकेकडे लागले आहे. त्याला पकडल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा खरा चेहरा समोर येणार, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button