
सरकारी जमिनीवर घर बांधून राहताय? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे ! राज्यातील निवासी अतिक्रमणं नियमित करण्याच्या दिशेने फडणवीस सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. नेमका कसा आहे नवा निर्णय? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, सरकारच्या नव्या निर्णयामुळे २०११ सालापूर्वीची सरकारी जमिनीवर घरं बांधून राहणाऱ्या लाखो कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खरेतर या कुटुंबांना आपलं घर कधीही पाडलं जाईल, अशी भीती होती.
मात्र, आता ही निवासी अतिक्रमणं कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात ११५ विधानसभा क्षेत्रस्तरीय सहअध्यक्षांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. मात्र, ही अतिक्रमणं नियमित करताना नेमक्या कोणत्या अटी असतील? किती क्षेत्राला परवानगी मिळणार? आणि मालकी हक्क कधी मिळणार? याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तर मग मंडळी





