Latest

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत तरुणांनाही लाजवेल असा उत्साह ! ९३ आणि ८७ वर्षीय जेष्ठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदान म्हटलं की अनेकजण वेगवेगळी कारणं सांगून मतदान टाळतात. पण राहाता तालुक्यातील दोन ज्येष्ठ मतदारांनी मात्र वयाचं कारण न देता मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे सध्या या जेष्ठ मतदारांची चर्चा सुरू आहे. पण नेमकं काय घडलंय? सगळं सांगतो पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असताना राहाता येथे ९३ वर्षीय विष्णू गोविंद विखे यांनी मतदान केलं. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत ८७ वर्षीय पुंजा नाना धावणे यांनीही मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

एकीकडे तरुण मतदार मतदानासाठी बाहेर पडण्याबाबत उदासीन असताना, दुसरीकडे वयाची ऐंशी-नव्वदी पार केलेल्या या ज्येष्ठांनी मतदानाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

वय कितीही असो, मतदानाची जबाबदारी महत्त्वाची असते, हाच संदेश या दोघांनी दिला आहे. तर मग मंडळी, या ज्येष्ठ मतदारांचं तुम्हीही कौतुक कराल ना ? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button