
लाडक्या बहिणींनो, सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नेमकी काय आहे नवीन अपडेट? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर २०२६ चा हप्ता देण्यासाठी सरकारने ३४४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
म्हणजेच, पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पैसे नेमके कोणत्या दिवशी खात्यात जमा होतील, याची निश्चित तारीख समोर आलेली नाही.
तरीही दिवाळी आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केवायसीअभावी ज्यांचे पैसे अडकले आहेत, त्यांचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचं सांगितले जात आहे. तर मग मंडळी तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ? कमेंट करून नक्की सांगा.





