
रब्बी हंगामासाठी पाण्याची वाट पाहणाऱ्या अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनाबाबत नुकताच एक नवा निर्णय घेण्यात आला आहे.
कसा आहे नवा निर्णय? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, आता कुकडीचे आवर्तन १२ नोव्हेंबरऐवजी थेट ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आठवडाभर आधी पाणी मिळणार आहे.
मुंबईतील मंत्रालयात २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार काशिनाथ दाते यांनी आवर्तन लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.
विशेष म्हणजे, हे आवर्तन तब्बल ३५ दिवस चालणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय कुकडी लाभक्षेत्रातील केटी वेअर बंधारे भरून देण्याच्या मागणीवरही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.
तसेच पुढील आवर्तनांचं नियोजन दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन केलं जाणार आहे. तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा निर्णय कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा.





