
लग्न करण्याचा विचार करताय? किंवा नुकतंच लग्न झालंय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विवाह नोंदणीच्या नियमात आता बदल झालाय. काय आहे नेमक प्रकरण? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी वधू-वरांचं वय सिद्ध करण्यासाठी केवळ आधार कार्डावर अवलंबून राहता येणार नाही, असे महत्त्वाचे निर्देश अलाहाबाद हायकोर्टाने दिले आहेत.
न्यायमूर्ती तेज प्रताप तिवारी यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे निर्देश दिले. बालविवाह रोखण्यासाठी न्यायालयाने विवाह नोंदणी प्रक्रियेत वयाची योग्य पडताळणी करण्यावर भर दिला आहे.
आधार कार्ड हे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी उपयोगी असलं, तरी जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी ते स्वतंत्रपणे वैध कायदेशीर पुरावा मानता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
वय पडताळण्यासाठी मान्यताप्राप्त शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळेतील जन्मनोंद किंवा अधिकृत जन्मदाखला यांसारख्या कागदपत्रांचा आधार घेतला जाऊ शकतो. शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबतही स्वतंत्र पडताळणी आवश्यक ठरू शकते.
कायद्यानुसार, विवाहासाठी मुलाचं वय किमान २१ वर्षे, तर मुलीचं वय किमान १८ वर्षे असणं आवश्यक आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.





