
अहिल्यानगरमध्ये कांद्याचे भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. पण जिल्ह्यात कुठे मिळतोय हा विक्रमी दर? सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, घोडेगाव उपबाजारात नवीन लाल कांद्याने ६० रुपये किलोपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.
घोडेगाव उपबाजारात सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी कांद्याचे लिलाव झाले. यावेळी तब्बल २० हजार ४३८ गोण्यांची आवक झाली. बाजारात सर्वसाधारण कांद्याला ४२ ते ४५ रुपये किलो भाव मिळाला. उत्तम प्रतीच्या जुन्या कांद्याला ५५ रुपये, तर नवीन लाल कांद्याला सर्वाधिक ६० रुपये किलो दर मिळाला.
प्रतीनुसार दर पाहिले तर पहिल्या दर्जाच्या कांद्याला ४८ ते ५२ रुपये, दुसऱ्या दर्जाला ४३ ते ४५ रुपये, तर तिसऱ्या दर्जाच्या कांद्याला ३० ते ३५ रुपये किलो भाव मिळाला. नवीन लाल कांद्याचा सरासरी दर ४५ ते ५० रुपये होता.
कमी पाऊस आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, सध्याच्या दरांमुळे काहीसा दिलासा मिळतोय. तुमच्या भागात कांद्याला काय भाव मिळतोय ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





