Latest

१४० किलोमीटर वेगाने चक्रीवादळ धडकणार ! महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार ?

बंगालच्या उपसागरात मोठं संकट घोंघावतंय ! ताशी १४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात नेमका कुठे पाऊस पडणार ? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळाची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर या वादळाचा परिणाम जाणवू शकतो. बापटला ते विशाखापट्टणमदरम्यानचा किनारी भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे.

या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, तर काही परिस्थितींमध्ये तो १४० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ३० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विदर्भाला विशेष सतर्क राहण्याची गरज आहे.

मात्र, चक्रीवादळाची दिशा आणि पावसाचा नेमका अंदाज बदलू शकतो. त्यामुळे हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा. तुमच्या भागात पावसाची स्थिती कशी आहे? कमेंट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button